बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्राने ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहसोहळ्याला हजेरी लावली. या लग्नाला प्रियांका हजर राहणार की नाही याविषयीच्या बऱ्याच चर्चांना कलाविश्वात उधाण आले होते. युकेमध्ये पोहोचल्यानंतर सोशल मीडियावरून प्रियांका चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असल्याचे पाहायला मिळाले.