गांधी जयंतीला रेल्वेध्ये नॉनव्हेज मिळणार नाही

सोमवार, 21 मे 2018 (11:02 IST)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीला रेल्वेमध्ये मांसाहारी जेवण दिले जाऊ नये, अशी शिफारस रेल्वे मंत्रालयाने केंद्र सरकारला केली आहे. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छता दिनासोबतच 'शाकाहारी दिन' म्हणूनही साजरा केला जावा, असेही रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
 
2018-19 हे वर्ष गांधीजींचे 150 वे जयंती वर्ष असून त्या निमित्ताने केंद्र सरकार अनेक उपक्रम हाती घेणार आहे. सरकारच्या विविध खात्यांकडून त्याबाबतचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. रेल्वे खात्याने केलेल्या शिफारशी याच प्रस्तावाचा भाग आहेत.
 
महात्मा गांधी हे स्वतः शाकाहारी होते. मांसाहाराचा त्यांना तिटकारा होता. सर्वांनी शाकाहारी होऊन प्राण्यांप्रती होणारी हिंसा टाळावी, असा त्यांचा विचार होता. याचा दाखला देत 2018 ते 2020 या तीन वर्षातील गांधी जयंतीच्या दिवशी रेल्वेत मांसाहारी जेवण मिळू नये, असे रेल्वे खात्याने सुचवले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती