मुंबईत निरोप भाषणाच्या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

रविवार, 6 एप्रिल 2025 (15:37 IST)
महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात एका महाविद्यालयात निरोप भाषण देताना एका 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वर्षा खरात असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. 
ALSO READ: मुंबईतील बेकायदेशीर मशिदीं विरुद्ध किरीट सोमय्या यांची मोहीम,72 तक्रारी दाखल
निरोप समारंभात भाषण देताना ती एकाएकी बेशुद्ध पडली. तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
सदर घटना शिंदे महाविद्यालय परांडा येथे घडली आहे. व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे की, 20 वर्षीय वर्षा खरात तिच्या भाषणाची सुरुवात उत्स्फूर्तपणे करते. ती स्मितहास्य करत शिक्षक आणि मैत्रिणींना उद्धेशून बोलत असते. काहीच क्षणात तिचा चेहरा फिकट पडतो आणि ती अडखळून खाली कोसळते.
ALSO READ: धक्कादायक : मुंबईत सात वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करून हत्या
उपस्थित लोकांना काहीही समजले नाही मात्र ते तिच्याकडे धाव घेतात आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. तिला शुद्ध येत नाही तर तिला तातडीने रुग्णालयात नेतात. तिथे डॉक्टर मृत घोषित करतात.
 
मयत वर्षावर वयाच्या आठव्या वर्षी हृदयशस्त्रक्रिया झाली होती. गेल्या 12 वर्षांपासून तिला प्रकृतीविषयी कोणतीही तक्रार नव्हती किंवा ती कोणतेही प्रकाराचे औषध घेत नव्हती.डॉक्टरांच्या मते भाषणादरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आला नंतर तिला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित करण्यात आले.  
ALSO READ: मुंबई: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वेगवान डंपरने पादचाऱ्याला चिरडले, चालकाला अटक
वर्षाच्या मृत्यू नंतर महाविद्यालयात शोककळा पसरली आहे. महाविद्यालय प्रशासनाने तिच्या निधनाबद्दल एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. तिच्या शिक्षकांनी आणि मैत्रिणीनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा हुशार विद्यार्थिनी होती आणि सतत आनंदी आणि हसतमुख असायची. तिच्या निधनाने महाविद्यालयात दुःख व्यक्त केले जात आहे. 
Edited By - Priya Dixit  
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती