74व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्त कॉसमॉस-मायातर्फे नवीन शो 'कॅप्‍टन भारत'

शनिवार, 15 ऑगस्ट 2020 (08:03 IST)
यंदाच्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्त 'मोटू पतलू', 'सेल्‍फी विथ बजरंगी' आणि 'बापू' अशा लोकप्रिय लहान मुलांच्‍या शोजसाठी ओळखले जाणारे अॅनिमेशन स्‍टुडिओ कॉसमॉस-माया नवीन साहसी क्षेत्रामध्‍ये प्रवेश करत आहे. त्‍यांनी त्‍यांचा नवीन आयपी शो 'कॅप्‍टन भारत'ची घोषणा केली आहे.
 
युवा प्रेक्षकांना अर्थपूर्ण विचार करण्‍यास प्रोत्‍साहित करणारा कन्‍टेन्‍ट देण्‍याच्‍या कॉसमॉस-मायाच्‍या गत विक्रमाशी बांधील राहत 'कॅप्‍टन भारत' हा भारतीय युवांच्‍या देशभक्‍तीवर आवाज, अधिकाराला सादर करतो आणि शाळेत जाणा-या तरूण पिढीमध्‍ये मजेशीर व अॅक्‍शन-पॅक अवतारामध्‍ये भारताप्रती प्रेम जागृत करतो. ही एका भारतीय सैनिकाची कथा आहे. तो प्रेम करत असलेल्‍या देशाच्‍या नावावरून त्‍याचे नाव ठेवण्‍यात आले आहे. तो विविध गॅझेट्स, शस्‍त्रे व साधनांचा उपयोग करत देशावर येणा-या
कोणत्‍याही संकटांचा सामना करतो आणि गरजू लोकांचे रक्षण करतो.
 
कॉसमॉस-माया ऑफर करत असलेल्‍या कन्‍टेन्‍टच्‍या विषयांसंदर्भात आणि त्‍यांची पात्रे सादर करत असलेल्‍या अनोख्‍या सामाजिक संबंधित संवादांसंदर्भात निर्णय घेताना नेहमीच विशिष्‍ट पद्धत अवलंबत आली आहे. विशेषत: गेल्‍या काही वर्षांपासून राष्‍ट्रीयता व देशभक्‍ती मूल्‍यांना आवश्‍यक महत्त्व देण्‍यात आले आहे. 'कॅप्‍टन भारत' भारतीय उपखंडातील अर्धबिलियनहून अधिक मुलांमध्‍ये उत्‍साहपूर्ण पद्धतीने ही मूल्‍ये बिंबवणार आहे. शोच्‍या तत्त्वामध्‍ये ही बाब सुरेखरित्‍या अवलंबण्‍यात आली आहे:
 
मेरी आन तिरंगा है,
मेरी शान तिरंगा है,
भारत के बच्‍चे-बच्‍चे की
जान तिरंगा है
'कॅप्‍टन भारत' हा अनोखा अॅनिमेटेड शो असणार आहे. भारतातील इतर कोणत्‍याच अॅनिमेटेड शोने आतापर्यंत राष्‍ट्रीय अभिमान व देशभक्‍तीपर वीरतेला दाखवलेले नाही. कॉसमॉस-मायाचे सीईओ अनिष मेहता म्‍हणाले, ''कन्‍टेन्‍ट निर्माते म्‍हणून आम्‍ही आमचे प्रेक्षक काय पाहत आहेत आणि त्‍यांच्‍याभोवताली असलेल्‍या विश्‍वामध्‍ये काय घडत आहे यामधील पोकळी नेहमीच भरून काढली पाहिजे. त्‍याअनुषंगाने आम्‍ही कार्टून्‍स व कन्‍टेन्‍ट सादर करण्‍याचा प्रयत्‍न करतो. हा कन्‍टेन्‍ट लहान मुलांना व कुटुंबाना आवडतो आणि त्‍यामधून त्‍यांना नेहमीच संबंधित संदेश मिळतो. तसेच ते अशा कन्‍टेन्‍टची प्रशंसा देखील करतात. 'कॅप्‍टन भारत' शो आपल्‍या देशाची लोकशाही व विविधतेमधील एकतेला प्रशंसित करतो. आमची असे पात्र सादर करण्‍याची इच्‍छा होती, जो लहान मुलांसाठी आदर्श ठरेल आणि त्‍यांना भविष्‍यात अभिमानी, जबाबदार नागरिक बनण्‍यासाठी प्रोत्‍साहित करेल. या खास दिवसाचा देशभक्‍तीपर उत्‍साह उंचावत ठेवत आम्‍हाला हा नवीन शो सादर करण्‍याचा अत्‍यंत आनंद होत आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, या शोच्‍या माध्‍यमातून आम्‍ही भारतभरातील युवा व त्‍यांच्‍या कुटुंबांसोबत त्‍वरित व प्रबळ नाते निर्माण करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होऊ. 'कॅप्‍टन भारत' अभिमानाने 'जय हिंद' 
म्‍हणण्‍यासाठी आमच्‍या स्‍टुडिओमध्‍ये येत आहे.''
'कॉसमॉस-मायाचे चीफ क्रिएटिव अधिकारी सुहास कडव म्‍हणाले, ''कॅप्‍टन भारत हा भारताचे सर्वोत्तम सैन्‍यदल आणि आपल्‍या देशाचे बाह्य व अंतर्गत संकटांपासून संरक्षण करणारे सुरक्षा कर्मचारी यांना अॅक्‍शनने भरलेली एक मानवंदना आहे. सीबीच्‍या माध्‍यमातून आमचा तरूण पिढीमध्‍ये देशभक्‍ती व देश, झेंडा यांप्रती प्रेम आणि सैन्‍यदलाप्रती आदर अशी मूल्‍ये बिंबवण्‍याचा प्रयत्‍न आहे. लहान मुलांवर चांगल्‍या गोष्‍टींचा मोठा प्रभाव पडतो. आम्‍ही नेहमीच लक्ष वेधून घेणा-या मनोरंजनपूर्ण कन्‍टेन्‍टच्‍या माध्‍यमातून त्‍यांना अर्थूपूर्ण व संबंधित देण्‍याचा आणि त्‍यांच्‍यामध्‍ये सामाजिकदृष्‍ट्या जबाबदार नागरिक बनण्‍याची मूल्‍ये बिंबवण्याचा प्रयत्‍न करतो.''

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती