देशमुख व शिंदे यांनी राज्याचा बँडबाजा वाजविला - नितीन गडकरी

मंगळवार, 16 एप्रिल 2019 (19:19 IST)
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत. भाजपचे नेते गडकरी सुद्धा पक्षाचा जोरदार प्रचार करत असून विरोधकांवर टीका करत आहेत. यामध्ये त्यांची प्रचारसभा सोलापूर येथे झाली यावेळी त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख आणि कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गडकरी म्हणाले की काँग्रेस पक्षाने फक्त आपल्या चेले-चपट्यांची गरिबी दूर केली. तर सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला, अशी जोरदार टीका भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रचारार्थ गडकरींची जाहीर सभा झाली. 
 
यावेळी गडकरींनी काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपला चिंता आहे तरुणांना रोजगार उपलब्ध करवून देण्याची तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या मुलांना रोजगार मिळवून देण्याची चिंता लागली आहे असेही गडकरी म्हणाले आहेत. “मेरा भारत महान और मुझे नही दिया तो दे दो कम से कम देशी दारु का दुकान”, अशी मिश्किल टिप्पणी गडकरींनी केली आहे. एक पाव डटाओ, गरिबी हटाओ, हो गया विकास… ना जात पर ना बात पर, सोनियाजी और शरद पवार के हात पर, अशा कोपरखळ्या गडकरींनी लगावल्या आहेत. गडकरी स्वतः नागपूर येथून लोकसभा उमेदवार असून त्यांच्या विरोधात कॉंग्रेस कडून नाना पटोले उमेदवार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती