दूरसंचार कंपन्या एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया लाइफटाइम फ्री कॉलिंग सुविधा बंद करणार आहे. अशात एखाद्या नंबराला सक्रिय ठेवण्यासाठी ग्राहकांना प्रत्येक महिन्यात एक निश्चित राशीचे रिचार्ज करण्याची गरज राहील. सप्टेंबर 2016मध्ये जियो आल्यानंतर सर्व कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना मोफत इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलची सुविधा दिली होती, पण त्याने त्यांच्या कमाईवर वाईट परिणाम होत आहे. म्हणून कंपन्यांनी टॅरिफ प्लानची समीक्षा केली आहे.
यात, एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया ने आता कुठलेही प्री पेड नंबर सक्रिय ठेवण्यासाठी निश्चित अवधीचे न्यूनतम टॅरिफ आणले आहे. जसे की एअरटेल ने 35, 65 आणि 95 रुपयांचा मिनिमम रिचार्ज प्लान पेश केला आहे, यात टॉकटाइम, डाटासोबत 28 दिवसांची वैधता मिळेल.