JioPhone 2 च्या खरेदीसाठी ओपन सेल

मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (08:01 IST)
JioPhone 2 च्या खरेदीसाठी 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान या फोनसाठी ओपन सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. जिओचं अधिकृत संकेतस्थळ Jio.com वर 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून हा सेल सुरू झाला आहे. पेटीएम वॉलेटद्वारे पैशांचा भरणा करुन 200 रुपये कॅशबॅकही मिळवू शकतात.  
 
Qwerty कीपॅड, यू ट्यूब, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’अॅप, हॉरिझेंटल डिस्प्ले ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे असून 2 हजार 999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे. फोनमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. या 4जी फोनमध्ये 2000 एमएएच बॅटरी असून त्यामुळे 14 तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती