WhatsApp Chat Lock लपविणे खूप सोपे, फक्त सेटिंग्जमध्ये हा पर्याय चालू करा

सोमवार, 11 डिसेंबर 2023 (16:35 IST)
WhatsApp Chat Lock Hide Setting: जगभरात, व्हॉट्सअॅप हे एक असे प्लॅटफॉर्म बनले आहे जे लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी ओळखले जाते. अनेक कंपन्या व्हॉट्सअॅपचा वापर केवळ अनधिकृतच नव्हे तर अधिकृतपणेही करतात. व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हे व्यासपीठ आता पसंत केले जात आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्हॉट्सअॅप चॅनेलद्वारे अधिकाधिक लोक सामील होत आहेत.
 
या वर्षी व्हाट्सएपवर अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स जारी असताना यात एक चॅट लॉक फीचर देखील आहे ज्याने यूझर्सला प्रायव्हेट चॅट करणे अजूनच सोपे झाले आहे. वापरकर्ते चॅट लॉकद्वारे कोणतेही चॅट लॉक करू शकतात, जे त्यांनी एंटर केलेल्या पासवर्डने उघडता येत नाही.
 
मात्र या फीचरचा वापर करणाऱ्यांपैकी बहुतांश युजर्सची तक्रार आहे की चॅट लॉक केल्यानंतर लॉक्ड चॅट्सचा आयकॉन वर दिसत आहे, त्यामुळे जर आपणही यामुळे त्रस्त असाल तर हवे असल्यास ते लपवणे देखील खूप सोपे आहे.
 
होय तुम्ही काही मिनिटांत चॅट लॉक देखील लपवू शकता, यासाठी तुम्हाला फक्त सेटिंगमध्ये जाऊन एक पर्याय चालू करावा लागेल. जेव्हा तुम्ही WhatsApp वर चॅट लॉक करता तेव्हा एक फोल्डर तयार होते, जे चॅट लॉक म्हणून दाखवले जाते. तुम्हाला फक्त तिथे जाऊन एक पर्याय चालू करावा लागेल.
 
Secret Code for Hiding WhatsApp Chat Lock
व्हाट्सएप ओपन करा अाणि चॅट लॉक ऑप्शन शो होत असल्यावर क्लिक करा.
नंतर Chats Lock मध्ये आपल्याला Chat Lock Settings शो होणार त्यावर क्लिक करा.
येथे Hide Lock Chats आणि Secret Code शो होत असेल.
Secret Code सिलेक्ट करुन आपण कोणताही कोड एंटर करु शकता, जे फोन लॉकपेक्षा वेगळं असू शकतं.
दोनदा सीक्रेट कोड एंटर करुन कन्फर्म करा.
नंतर Hide Lock Chats ऑप्शन देखील सिलेक्ट करा.
याप्रकारे लॉक चॅट तेव्हाच शो होईल जेव्हा आपण सीक्रेट कोड एंटर कराल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती