कधी कधी बघितलेले स्वप्न कधी पूर्ण होतील हे सांगता येणं अवघड आहे.असे अमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांचा बाबतीत झाले आहेत.त्यांनी लहान वयात असताना एक स्वप्न बघितले होते आणि आज त्या स्वप्नाची पूर्णता होण्याच्या मार्गावर आहे.त्यांनी बघितलेल्या स्वप्नाप्रमाणे ते त्यांची कंपनी ब्लू ओरिजनच्या न्यू कॅप्सूल मधून चक्क 11 मिनिटासाठी अंतराळाच्या प्रवासासाठी जाणार आहेत.
बेझोस हे तीक्ष्ण आणि तल्लख बुद्धीचे विद्यार्थी होते.त्यांची स्वप्ने देखील इतर मुलांपेक्षा आगळी वेगळी होते.ज्या किशोरवयात मुलं मुली वेगळ्याच उत्साहात असतात त्या वयात बेझोस आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीत होते. त्यांनी अंतराळात एक पार्क बनवायचे असे स्वप्न बघितले होते आणि आता त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार.