एअरटेल डीजीटल टीव्हीचे नवीन पॅक

शनिवार, 25 मे 2019 (09:50 IST)
एअरटेल डीजीटल टीव्हीने आपल्या ग्राहकांसाठी नवीन पॅक जारी केला आहेत. कंपनीने सहा नवीन लॉन्ग टर्म प्लॅन आणले आहेत. यामध्ये सहा महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत मर्यादा असलेले प्लॅन आहेत. या प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे चॅनल्स पाहता येणार आहे. याआधीही कंपनीने काही रिजनल पॅक जारी केले होते. 
 
Hindi Value SD Pack:  या प्लॅनची मर्यादा सहा महिन्यांची आहे. याची किंमत महिन्याला 280 रुपये आहे. यामध्ये झी, स्टारसमेत इतर चॅनल्सचा समावेश आहे. या पॅकची मर्यादा 195 दिवसांसाठी (180 दिवस + 15 दिवस अतिरिक्त) दिली आहे. सहा महिन्यासाठी ग्राहकांना 1,681 रुपये द्यावे लागतील. तर, एक वर्षांसाठी 3, 081 रुपये द्यावे लागतील. ही किंमत सँडर्ड कनेक्शनसाठी आहे. मल्टीपल कनेक्शनसाठी याची किंमत 2,431 रुपये आहे. 
 
UDP Pack: हा एसडी पॅकची मर्यादा सहा महिन्यांसाठी आहे.यासाठी ग्राहकांना 799 रुपये द्यावे लागतील. तर एक वर्षासाठी 1,349 रुपये मोजावे लागतील. ही किंमत सँडर्ड आणि मल्टी-टीव्ही सब्सक्रिप्शन दोन्हींसाठी आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती