गुगल बऱ्याच काळापासून आपली सेवा विनामूल्य देत आहे, परंतु आता प्रीमियमची वेळ आली आहे. गुगल आता वापरकर्त्यांना शोधासाठी शुल्क आकारणार आहे. एका रिपोर्टनुसार, गुगल आपला जनरेटिव्ह सर्च म्हणजेच सर्च जनरेटिव्ह एक्सपिरियन्स (SGE) पेड करणार आहे, त्यानंतर यूजर्सला AI रिझल्टसाठी पैसे द्यावे लागतील.
एका रिपोर्टनुसार, गुगल आपल्या AI सर्च टूलसाठी पैसे घेण्याचा विचार करत आहे, या मुद्द्यावर गुगल कडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही, परंतु अनेक AI कंपन्या त्यांच्या AI टूलसाठी पैसे घेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे एआय टूल्स विकसित करण्यासाठी कंपन्यांना मोठा खर्च करावा लागत आहे.