गुगलची सहा वर्षांपूर्वी सुरू झालेली ही सेवा बंद होणार

मंगळवार, 2 एप्रिल 2024 (13:18 IST)
एप्रिल 2024 च्या सुरूवातीस, गूगल आपली एक सेवा बंद करणार आहे. गुगल पॉडकास्ट 2 एप्रिलनंतर बंद होईल, जरी हे ॲप अद्याप गूगल प्ले-स्टोर  आणि ॲपल  च्या ॲपस्टोर वर उपलब्ध आहे. गुगलने जून 2018 मध्ये पॉडकास्ट लाँच केले.
 
गूगल ने म्हटले आहे की ज्या वापरकर्त्यांनी गूगल पॉडकास्ट चे सदस्यत्व घेतले आहे, त्यांचे सदस्यत्व यूट्यूब म्यूजिक वर हलवले जाईल. गूगल  वापरकर्त्यांना पॉडकास्ट बंद करण्याबाबत ई-मेलद्वारे माहिती देत ​​आहे.
गूगल ने हळूहळू यूट्यूब म्युझिक सह पॉडकास्ट वैशिष्ट्ये एकत्रित करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत यूट्यूब म्युझिक आणि पॉडकास्ट एकाच ॲपमध्ये दिसू लागले आहेत. तो लवकरच इतर देशांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
 
जगभरात गूगल पॉडकास्ट ॲप 50 कोटींहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. एका रिपोर्टनुसार, लोकांना पॉडकास्ट ॲपऐवजी यूट्यूब म्युझिक वापरायचे आहे. गूगल यूट्यूब म्यूजिकमध्ये पॉडकास्ट वैशिष्ट्ये देखील जोडत आहे, ज्यामध्ये RSS फीड देखील समाविष्ट आहेत.
 
याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुगलने आपल्या जीमेलचे 10 वर्षे जुने फीचर बंद करण्याची घोषणा केली होती. गूगल ने जानेवारी 2024 मध्ये जीमेलचे मूलभूत एचटीएमएल (HTML )व्ह्यू  काढून टाकले आहे. जीमेलचे मूलभूत एचटीएमएल (HTML ) व्ह्यू वापरकर्त्यांना वेगळ्या प्रकारे ई-मेल सादर करते. 
 
या मोडमध्ये सर्च, इमेजेस, नकाशे यासारखे गूगलचे ॲप्स जीमेल पेजवरच सपोर्ट करतात.एचटीएमएल (HTML )मोड धीमे इंटरनेट कनेक्शन आणि जुन्या ब्राउझरसाठी डिझाइन केले होते. या मोडमध्ये जीमेल लहान टेक्स्ट मध्ये  दिसते. हा खूप जुना मोड आहे जो आता वापरला जात नाही. 
 
 Edited by - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती