Free Netflix-Prime Video Subscription जर आपल्याला ओटीटी प्लेटफॉर्म (OTT Platform) वर व्हिडिओ बघण्याची आवड असेल तर नक्कीच आपल्याला अमेजन प्राइम वीडियो (Amazon Prime Video) आणि नेटफ्लिक्स (Netflix) अॅप्स हवे असतील. जर याचे सब्सक्रिप्शन (OTT Subscription) घेत असाल तर यासाठी चांगलची रक्कम मोजावी लागत असेल. पण आता आम्ही अशी योजना सांगत आहोत ज्यामध्ये आपण वर्षभर फ्री मध्ये यावर मनोरंजन करु शकता.
जिओचा 399 रिचार्ज प्लान
जिओ आपल्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनेक फायदे देते. जर तुम्ही हा प्लान घेतला तर तुम्हाला यामध्ये 75 जीबी डेटा मिळेल, तसेच 200 जीबी डेटा देखील दिला जात आहे. जर तुमचा इंटरनेट डेटा संपला तर तुम्हाला प्रति जीबी 10 रुपये आकारले जातील. एवढेच नाही तर तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह 100 एसएमएस देखील मिळतात. तुम्ही रिचार्ज करताच तुम्हाला नेटफ्लिक्सचे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मिळेल.
जिओचा 599 चा प्लान
तुम्ही Jio च्या नंबरवर 599 चा रिचार्ज केल्यास तुम्हाला 100 GB डेटा ऑफर दिली जाते. यासोबतच रोलओव्हर प्लॅन अंतर्गत 200 GB डेटा देखील दिला जातो. या प्लॅनमध्ये यूजरला अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime Video चे फक्त एक वर्षासाठी सबस्क्रिप्शन दिले जाते. यासोबतच, Jio च्या इतर सेवा जसे की Jio TV, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
जिओचा 799 चा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये कंपनी यूजर्सला 150 GB डेटा देते. याशिवाय रोलओव्हर प्लानमध्ये 200 GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना Amazon Prime Video आणि Netflix या दोन्हींचे सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय Jio च्या इतर सेवा Jio TV, Jio Cinema, Jio Cloud देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये कुटुंबातील दोन सदस्य जोडले जाऊ शकतात.