आयपीएल 2024 चा 53 वा सामना पंजाब आणि CSK यांच्यात रविवार, 5 मे रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होणार.दोन्ही संघ आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार. या सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना सीएसकेच्या प्लेइंग-11 मध्ये परत येऊ शकतो.
पंजाब किंग्ज ने अहमदाबाद मध्ये गुजरातवर, चेपाक मध्ये सीएसके वर, आणि केकेआर विरुद्ध विक्रमी धावसंख्येचा पाठलाग केला. संघाच्या गोलंदाजी विभागात कागिसो रबाडा, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि सॅम कुरान या अनुभवी नावांचा समावेश आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
पंजाब किंग्ज: जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिले रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
चेन्नई सुपर किंग्ज: अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डेरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, रिचर्ड. मथीशा पाथिराना.