आयपीएलमध्ये कोरोना संकट कायम, बीसीसीआय वैद्यकीय पथकातील एका सदस्याला कोरोना

शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (08:24 IST)
यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये स्थलांतरित केली गेली असली तरी तेथेही कोरोनाचे संकट कायम आहे. बीसीसीआय वैद्यकीय पथकातील एका सदस्याला कोरोना झाला आहे. 
 
मागील आठवडय़ात चेन्नई सुपरकिंग्स संघातील दीपक चहर व ऋतुराज गायकवाड या २ खेळाडूंसह एकूण १३ सदस्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर बीसीसीआयचा सदस्य कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही संख्या १४  वर पोहोचली आहे.
 
आयपीएल कार्यकारिणीने मागील आठवडय़ात एका वेबिनारचे आयोजन केले. त्या वेबिनारसाठी वैद्यकीय पथकाच्या सहायक गटातील काही सदस्य कार्यरत होते. त्यात या सदस्याचा समावेश होता. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या सदस्याला स्वतंत्र कक्षेत हलवण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती