साराच्या आईने केवळ तिच्या पोस्टमध्ये मृत्यूची माहिती दिली. WWE स्टारचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप समजलेले नाही. सारा लीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर WWE व्यतिरिक्त, अलेक्सा ब्लिस, बेकी लिंच, मिक फॉली यांसारख्या अनेक स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला.
सारा लीने जवळपास एक वर्ष WWE मध्ये फाईट केली आहे सारा ली WWE च्या रिअॅलिटी सीरिज टफ इनफच्या सीझन 6 ची विजेती देखील आहे. 2016 च्या शेवटी, साराने तिचा शेवटचा सामना खेळला. ती रिअॅलिटी मालिका टफ इनफ सीझन 6 ची विजेती देखील आहे. सारा लीने पाच वर्षांपूर्वी माजी WWE सुपरस्टार वेस्ली ब्लेकसोबत 30 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले.