मिळालेल्या माहितीनुसार हे विमान सुमारे 5900 फूट उंचीवर उडत होते आणि दोघेही पती पत्नी लास वेगासहून कॅलिफोर्नियाकडे जात होते. 78 वर्षीय एलियट आल्पर यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा परिस्थिती गंभीर बनली. विमान हवेत डोलत होते आणि यव्होनला ना उड्डाणाचा अनुभव होता ना परवाना. पण घाबरण्याऐवजी त्यांनी धाडस दाखवत एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सूचनांनुसार यव्होनने विमानाचा ताबा घेतला. व विमान सुरक्षित उतरविले.