रविवारी पाकिस्तानात प्रचंड राजकीय आंदोलन झाले, राजधानी इस्लामाबादमध्ये केवळ राजकीय घडामोडीच झाल्या नाहीत तर सुबा-ए-पंजाबमध्येही राजकीय नाट्य पाहायला मिळाले. पंजाब प्रांताच्या विधानसभेत रविवारी महिला आमदार एकमेकांना भिडले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. डॉन न्यूजने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये महिला एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.
रविवारी पंजाब विधानसभेचे नवीन सभागृह नेते आणि मुख्यमंत्री निवडण्यासाठी अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र नॅशनल असेंब्लीप्रमाणे पंजाब विधानसभेचे कामकाजही मतदानाशिवाय ६ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले. अधिवेशन तहकूब झाल्यानंतर सरकार आणि विरोधकांचे आमदार एकमेकांना भिडले, त्यात महिला आमदारांचाही समावेश आहे.
पाकिस्तानातील संपूर्ण विरोधक इम्रान खानविरोधात एकवटले आहेत. रविवारी, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार होते, परंतु स्पीकरनेच हा प्रस्ताव फेटाळून लावला. यानंतर विरोधकांनी संसदेत प्रचंड गदारोळ केला आणि स्वतःचा सभापती निवडला. दुसरीकडे, इम्रान खान यांच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी पाकिस्तानची संसद बरखास्त केली. सध्या पाकिस्तानचे सरकार बरखास्त झाले असून इम्रान खान काळजीवाहू पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेत आहेत. दुसरीकडे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.