कतार ओपेक देशांच्या समूहातून बाहेर पडणार

मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (08:58 IST)
जगातील सर्वात जास्त एलपीजी निर्यात करणारा कतार तेल उत्पादक देशांच्या समूहातून (ओपेक) बाहेर पडणार आहे. कतारचे उर्जामंत्री साद अल काबी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आमच्या देशाने नैसर्गिक वायू उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही ओपेकमधून बाहेर पडणार आहोत. आम्ही जानेवारी 2019 ला ओपेकचे सदस्यत्व सोडणार आहोत. ओपेकला याबाबतची माहिती देण्यात आल्याचे काबी यांनी सांगितले. ओपेक देशांची 6 डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्या बैठकीपूर्वीच कतारने हा निर्णय घेतला आहे. 1961 मध्ये ओपेकची स्थापना झाल्यानंतर वर्षभरातच कतार ओपेकमध्ये सहभागी झाले होते. ओपेकमधून बाहेर पडणारा कतार हा पहिलाच देश आहे. सौदी अरब, यूएई,बहारीन आणि इजिप्त या शेजारील देशांशी कतारचे संबंध ताणले गेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर कतारने हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र, राजकीय हेतूने हा निर्णय घेतला नसल्याचे कतारने स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती