चीनमध्ये नेकेड लोन सर्व्हिस जोरात

शनिवार, 1 डिसेंबर 2018 (23:29 IST)
चीनमधील बँकांनी एक नवीन क्लृप्ती शोधून काढली आहे. कर्ज हवं असेल तर त्या बदल्यात बँका तरुणांकडून त्यांचे न्यूड सेल्फी मागत आहेत. जर ती व्यक्ती कर्ज फेडू शकली नाही, तर तो फोटो सार्वजनिक केला जाण्याची अटही या कर्जाच्या अटी आणि शर्तींमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. हा प्रकार चीनमध्ये भलताच फोफावला असून बँकांसोबत खासगी कंपन्याही हा फंडा वापरत आहेत. अशाप्रकारे कर्जाची देवाणघेवाण करण्याला नेकेड लोन सर्व्हिस असं म्हटलं जातं. चीन येथील एका अहवालानुसार, 2016मध्ये कर्ज देणाऱ्या अनेक कंपन्यांनी 161 तरुण-तरुणींचे न्यूड सेल्फी लीक केले होते. यात काही तरुणांचे व्हिडीओही होते. या तरुणांची वयं 19 ते 23 च्या दरम्यान होती. त्यांनी सुमारे 1000 ते 2000 डॉलर इतकं कर्ज घेतलं होतं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती