ताजिकिस्तानमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, अफगाणिस्तान आणि चीनही हादरले

गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (10:52 IST)
सीरिया आणि तुर्कस्तान भूकंपातून पूर्णपणे सावरले नव्हते की आता ताजिकिस्तानमध्ये जोरदार भूकंप झाला आहे. त्याची तीव्रता 6.8 इतकी मोजली गेली आहे. सीरिया-तुर्कीमध्ये भूकंपाची कमाल तीव्रता 7.8 होती पण त्यानंतर एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू मुरगोबपासून 67 किमी पश्चिमेला होता. भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने ताजिकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तान आणि चीनच्या सीमेवर असलेल्या भागातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.
 
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, ताजिकिस्तानमधील भूकंपाचा केंद्रबिंदू मुर्गोबपासून 67 किलोमीटर पश्चिमेला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.8 इतकी मोजली गेली आहे. सध्या कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती