मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी एक नवविवाहित जोडपे रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या घटनेत पती-पत्नी दोघेही एकत्र मृत्युमुखी पडले. पोलिसांनी सांगितले की, हा अपघात संध्याकाळी हल्धरपूर परिसरातील गढवा वळणाजवळ घडला. हे दोघे पिलखी वरुणा गावात महिलेच्या माहेरी जात होते.जेव्हा ते हल्धरपूरच्या गढवा वळणाजवळ पोहोचले तेव्हा एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिलीज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.