गाझामध्ये युद्धबंदीनंतर इस्रायलचा सर्वात मोठा हवाई हल्ला, अनेकांचा मृत्यू

मंगळवार, 18 मार्च 2025 (12:25 IST)
गाझामध्ये युद्धबंदीनंतर आज सकाळी इस्रायलचा सर्वात मोठा हवाई हल्ला झाला त्यात किमान 235 लोकांचा मृत्यू झाला.युद्धबंदीनंतर गाझामध्ये हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. हमासने इशारा दिला की गाझामध्ये इस्राईलचे नवीन हल्ले युद्द्धबंदीचे  उल्लंघन आहेत आणि त्यामुळे ओलिसांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
ALSO READ: उत्तर मॅसेडोनिया नाईटक्लबमध्ये आग लागून 51 जणांचा होरपळून दुर्देवी मृत्यू
 जानेवारीमध्ये युद्धबंदी लागू झाल्यानंतर गाझामध्ये हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, युद्धबंदी वाढवण्याच्या चर्चेत कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती न झाल्याने त्यांनी हल्ल्याचे आदेश दिल्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले. इस्रायल आता लष्करी ताकद वाढवून हमासविरुद्ध कारवाई करेल, असे नेतन्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
ALSO READ: इस्रायली सैन्याच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू, 14 जण जखमी
गाझासोबतच इस्रायलने लेबनॉन आणि सीरियामध्येही हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सीरियातील दारा भागातील एका निवासी भागावर हवाई हल्ले करण्यात आले. इस्रायलने लेबनॉनमध्ये दोन हिजबुल्लाह दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावाही केला. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: इस्त्राईलच्या हैफामध्ये चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू, चार जण जखमी
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती