गुरुवारी मध्य इस्रायलमध्ये पार्क केलेल्या तीन बसेसमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडली. यामागे अतिरेकी असल्याचा सरकारला संशय आहे. या स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. युद्धबंदी करारांतर्गत हमासने गाझामधून चार बंधकांचे मृतदेह परत केल्यानंतर इस्रायलमध्ये शोककळा पसरली असताना हे स्फोट झाले.
हे स्फोट 2000 च्या दशकात पॅलेस्टिनी उठावादरम्यान झालेल्या स्फोटांची आठवण करून देतात.
पोलिसांनी सांगितले की, पाचही बॉम्ब सारखेच होते आणि त्यात 'टाइमर' बसवले होते. बॉम्ब निकामी करणारे पथक जप्त केलेले बॉम्ब निकामी करण्यात व्यस्त आहे. शहराच्या महापौर, झिव्का ब्रोट यांनी सांगितले की, स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही हा एक चमत्कार होता. त्यांनी सांगितले की, या बसेस त्यांचा प्रवास पूर्ण करून उभ्या होत्या.