Brazil Plane Crash:ब्राझीलमध्ये विमानाचा मोठा अपघात, विमानातील सर्व 62 जणांचा मृत्यू

शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (11:20 IST)
ब्राझीलमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. ब्राझीलच्या साओ पाऊलो जवळ हा अपघात झाला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रादेशिक टर्बो प्रॉप विमानसः हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातामुळे ब्राझीलच्या आणि जगभरातील लोकांना धक्का बसला आहे. 

ब्राझीलच्या प्रादेशिक एअरलाईन्स ने या अपघाताची पुष्टी केली आहे. या विमानात 58 प्रवाशी आणि 4 क्रू सदस्य होते. हे विमान साओ पाउलो राज्यातील विन्हेडो भागात क्रॅश झाले असून यातील सर्व 62 जणांचा मृत्यू झाला आहे. 

घटनास्थळावरील साक्षीदारांनी सांगितले की स्थानिक रहिवाशांपैकी कोणीही जखमी किंवा जखमी झाले नाही. विमान कसे कोसळले हे प्रत्यक्षदर्शींनी घेतलेले व्हिडिओ मध्ये दिसत आहे. विमान प्रथम हवेत तरंगत होते आणि नंतर कापलेल्या पतंगाप्रमाणे जमिनीवर पडले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे दृश्य अत्यंत भयावह होते आणि हा अपघात अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक होता.

अपघाताची माहिती मिळतातच अधिकारी आणि आपत्कालीन सव्वाननी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. मात्र या विमानातील एकही जण  बचावला नाही. अपघाताच्या कारणांचा शोध सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती