करक जिल्ह्यातील अंबरी काल्ले चौक येथे सिंधू महामार्गावर हा अपघात झाला, ज्यात एक वाहन आणि प्रवासी बसची धडक झाली, पोलिसांनी सांगितले. या अपघातात किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, बसमध्ये एकूण किती प्रवासी होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जखमींच्या संख्येबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पोलीस आणि बचाव अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी या अपघातात नऊ प्रवाशांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.