ब्रसेल्स व पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ले घडविलेल्या दहशतवाद्यांकडून हा शस्त्रसाठी लपविण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर आत्तापर्यंत 40 घरांचा शोध घेऊन झाला असून बेल्जियमध्ये एका रात्रीत मारण्यात आलेल्या छाप्यांमध्ये चौकशीसाठी 40 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या 40 जणांपैकी 12 जणांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. यानंतर या 12 पैकी 3 बेल्जियम नागरिकांविरोधात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप ठेवण्यात येऊन इतरांना मुक्त करण्यात आले आहे. मात्र या नागरिकांना अटक करण्यात आल्यानंतरही दहशतवादी कृत्यांसाठी वापरण्यात येणारा शस्त्रसाठा शोधण्यात अद्यापी सुरक्षा दलास यश आलेले नाही. या पाश्र्वभूमीवर सुरक्षा दलांकडून राबविली जात असलेली ही मोहीम अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.