पण RIP हा शब्द आपल्या धर्माप्रमाणे वापरणे योग्य आहे का? हा विचार अगदी विद्वान-विदुषीसुध्दा करत नाही. खरं म्हणजे प्रत्येकाला त्याच्या धर्म- पंथ याप्रमाणे श्रद्धांजली व्हावी. म्हणूनच हिंदु माणसाचा मृत्यू झाल्यावर RIP लिहून श्रद्धांजली वाहणे योग्य नाही. कारण ज्यांना मृत्यूनंतर भूमीत गाडले जाते त्या धर्म आणि पंथाच्या बांधवांत RIP म्हणण्याची प्रथा आहे. RIP म्हणजे Rest In Peace. अशात हिंदु माणसाच्या मृत्यनंतर या प्रकारे भावना व्यक्त करणे चुकीचं ठरतं. खरं म्हणजे संपूर्ण जगात एखादी व्यक्ती वारल्यावर त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर शेवटची क्रियाकर्मे करणे हा त्याचा हक्क असतो.
Rest in peace चा नेमका अर्थ काय ?
Rest in peace म्हणजे शांतपणे विश्रांती घ्या ! RIP हा बहुतेक ख्रिश्चन धर्मात वापरला जातो, ते लोक ख्रिस्ती धर्माचे पालन करतात आणि RIP चा वापर देवाला प्रार्थना करताना आणि त्यांचे प्रियजन हे जग सोडून गेल्यावर शोक व्यक्त करताना करतात.
या अर्थाने ज्यांना दफन केलं जातं तेव्हा कयामतच्या दिवशी त्यांचा न्याय होईल म्हणून तोपर्यंत भूमीत शांतपणे विश्रांती करत कयामतच्या दिवसाची वाट पहा असा समजला जातो ! कारण त्यांचा पुनर्जन्मात विश्वास नसून कयामतपर्यंत मृत होणार्याची जागेतून सुटका नाही, असे त्यांचा धर्म सांगतो.
हिंदु धर्मात काय होतं ?
हिंदु धर्मात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात येतं अर्थात शरीर जाळतात. पुनर्जन्मासाठी या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात. म्हणून हिंदू धर्मात RIP हा वापरणे योग्य ठरतं नाही कारण आत्मा सद्गतीस गेल्याचे आपल्या धर्मात मानले जाते. आत्मा मुक्त होऊन त्याचा पुढील प्रवास नीट होवो, त्याला गती मिळावी अशी प्रार्थना केली जाते.
भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी
हिंदूंनी भावपूर्ण श्रद्धांजली असे म्हणावे. किंवा देव मृतात्म्यास सद्गती देवो असे म्हणावे. याचा अर्थ मृतत्म्याला पुण्यगती मिळावी, त्याचा पुढील प्रवास निर्विघ्न पार पडावा किंवा एखादा पुण्यवान मृत झाल्यास देवाने त्यांना वारंवार जन्म-मरणाच्या फेर्यातून मुक्त करावे अशी प्रार्थना केली जाते.