Magh Purnima 2021: माघ पौर्णिमा व्रत कथा

शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (12:01 IST)
एका पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता. दररोज मिळत असलेल्या भिक्षा आणि दान यावर त्याची जीविका सुरु होती. त्याला संतान नव्हती. एकदा त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी नगरात गेली असताना तिला सर्वांनी वांझ म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला. तेव्हा तिला एकाने 16 दिवस काली देवीची पूजा करण्यास सांगितले. सांगितल्याप्रमाणे पती-पत्नीने तसेच केले. त्यांची भक्ती बघून 16 दिवसांनंतर देवी प्रकट झाली आणि देवीने ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि म्हटले की आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावा. याप्रकारे प्रत्येक पौर्णिमेला दिवे वाढवत जावे जोपर्यंत किमान 32 दिवे होत नाही.
 
मग ब्राह्मणाने आपल्याला पत्नीला पूजेसाठी झाडावरुन आंब्याचं कच्चं फळ तोडून दिले आणि पूजा केल्यावर त्याची पत्नी गर्भवती झाली. प्रत्येक पौर्णिमेला देवीने सांगितल्याप्रमाणे ती दिवे लावत होती. देवीच्या कृपेने तिने एक पुत्राला जन्म दिला ज्याचे नाव देवदास असे ठेवले. देवदास मोठ्या झाल्यावर त्याला त्याच्या मामासोबत शिक्षण घेण्यासाठी काशी येथे पा‍ठवले. काशीत असे काही घडले की धोक्याने देवदासाचे विवाह झाले. देवदास म्हणाला की तो अल्पायू आहे तरी बळजबरी त्याचे विवाह केले गेले. जेव्हा देवदासला घेऊन जाण्यासाठी काळ आला तर ब्राह्मण दंपतीने पौर्णिमेचं व्रत केलं होते म्हणून काळ त्याला घेऊन जाण्यात असमर्थ ठरला. तेव्हापासून पौर्णिमा व्रत केल्याने संकट टळतं आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती