अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?

शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (09:11 IST)
१. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवता आणि त्याऐवजी स्वत:ला बदलण्यावर लक्ष केंद्रित करता.
 
२. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांना जसे आहे तसे स्विकारता.
 
३. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही हे समजून घेता की प्रत्येक जण आपापल्या जागी आपापल्या दृष्टीकोनातून बरोबरच असतो.
 
४. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही "सोडून देणे" शिकता.
 
५. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही नातेसंबंधांतून "अपेक्षा" करणं थांबवता आणि फक्त "देण्यासाठीच देणे" सूरू करता.
 
६. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही हे समजून घेता की तुम्ही जे काही करता, ते फक्त स्वतःच्या मन: शांतीसाठी करता.
 
७. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही जगाला, "मी किती बुद्धीमान आहे" हे सिद्ध करणे थांबवता.
 
८. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या कृतीला दुसऱ्यांच्या कडून मान्यता मिळवत नाही.
 
९. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवता.
 
१०. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःसोबत शांतपणे रहाता.
 
११. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही "गरज असणे" आणि "हवे असणे" यातील फरक ओळखता आणि सर्व "हव्या" असलेल्या गोष्टींचा त्याग करता. 
 
आणि सर्वात शेवटी आणि सगळ्यात अर्थपूर्ण!
 
१२. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही "आनंद" भौतिक गोष्टींशी जोडणे थांबवता!!

- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती