प्राणी, पक्षी, पूर्वज, दानव आणि देवतांच्या जीवनाच्या पद्धतीचे काही नियम असतात. पण मानवाच्या अनियमित जीवनशैलीमुळे तो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पासून लांब चालला आहे. आजारपण आणि शोकमध्ये गुंतून तो या जगाला निरोप देतो. किंवा जगाला खराब करण्यास तो जवाबदार असतो. कोरोनाने पूर्ण जगाला भारताचे अभिवादन संस्कार अवलंब करण्यास भाग पाडले आहेत. सनातन धर्मात प्रत्येक कृती नियमांशी बांधलेली आहे आणि हे नियम असे आहेत ज्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकाराचं बंधन वाटतच नाही, तर हे नियम आपल्याला यशस्वी आणि निरोगीच करतात.