गुरुशी निगडित पिवळ्या वस्तूंचे दान करा. पिवळ्या वस्तू म्हणजे सोनं, हळद, चण्याची डाळ, आंबे (फळ) इत्यादी.
बृहस्पतीच्या प्रतिमेला पिवळ्या वस्त्रावर विराजीत करा आणि त्याची पूजा करा. पूजेत केशरी चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल आणि प्रसादासाठी पिळवे पक्वान्न किंवा फळ अर्पित करावे.
गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करावे. अळणी भोजन करावे. भोजनात पिवळ्या रंगाचे पक्वान्न जसे बेसनाचे लाडू, आंबे, केळी इत्यादी सामील करावे.