मारुती(हनुमान)चे 108 नावं

मारुती, हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण ग्रंथ रामायणात एक पौराणिक चरित्र आहे. शिव पुराणानुसार हनुमानाला महादेवाचा दहावा अवतार मानले गेले आहे. रामायणानुसार हनुमान रामाचा परम भक्त, मित्र, दूत इत्यादी होता. ज्याने सुग्रीव इत्यादी वानरांना रावणाशी युद्ध करण्यासाठी  रामाचा साथ दिला. रामायण कालात सीतेचा शोध करत लंकेत गेला. रावणाला आपल्या पराक्रमातून भयभीत केले आणि लंका दहन केली.  रामायणाच्या सुंदर काण्डमध्ये लंकेतून परतताना अरिष्ट पर्वताहून उडीमारून समुद्र पार केला होता. हनुमानाचे बरेच नाव खाली देण्यात आले आहे :
 
हनुमान (मारुती)चे 108 नाव   (108 Names of Lord Hanuman in Marathi)
 
1.आंजनेया : अंजनाचा पुत्र
2.महावीर : सर्वात बहादुर
3.हनूमत : ज्याचे गाल फुललेले आहे  
4.मारुतात्मज : पवन देवासाठी रत्न सारखे प्रिय
5.तत्वज्ञानप्रद : बुद्धी देणारा  
6.सीतादेविमुद्राप्रदायक : सीताची अंगठी रामाला देणारा  
7.अशोकवनकाच्छेत्रे : अशोक बागेचा विनाश करणारा  
8.सर्वमायाविभंजन : छलचा विनाशक
9.सर्वबन्धविमोक्त्रे : मोह दूर करणारा  
10.रक्षोविध्वंसकारक : राक्षसांचा वध करणारा 
11.परविद्या परिहार : दुष्ट शक्तींचा नाश करणारा  
12.परशौर्य विनाशन : शत्रूच्या शौर्याला खंडित करणारा  
13.परमन्त्र निराकर्त्रे : राम नावाचा जप करणारा  
14.परयन्त्र प्रभेदक : शत्रूंचा नाश करणारा  
15.सर्वग्रह विनाशी : ग्रहांच्या खराब प्रभावांचा खात्मा करणारा  
16.भीमसेन सहायकृथे : भीमचा सहायक
17.सर्वदुखः हरा : दुखांना दूर करणारा  
18.सर्वलोकचारिणे : सर्व जागेवर वास करणारा  
19.मनोजवाय : ज्याची गती वार्‍या सारखी आहे  
20.पारिजात द्रुमूलस्थ : प्राजक्ताच्या झाडाखाली वास करणारा  
21.सर्वमन्त्र स्वरूपवते : सर्व मंत्राचा स्वामी  
22.सर्वतन्त्र स्वरूपिणे : सर्व मंत्र आणि भजनाचा आकारा सारखा  
23.सर्वयन्त्रात्मक : सर्व यंत्रांमध्ये वास करणारा  
24.कपीश्वर : वानरांचा देवता
25.महाकाय : विशाल रूप असणारा  
26.सर्वरोगहरा : सर्व रोगांना दूर करणारा  
27.प्रभवे : सर्वात प्रिय  
28.बल सिद्धिकर : परिपूर्ण शक्ती असणारा 
29.सर्वविद्या सम्पत्तिप्रदायक : ज्ञान आणि बुद्धि प्रदान करणारा  
30.कपिसेनानायक : वानर सेनेचा प्रमुख
31.भविष्यथ्चतुराननाय : भविष्यात घडणार्‍या प्रसंगांचा ज्ञाता  
32.कुमार ब्रह्मचारी : युवा ब्रह्मचारी
33.रत्नकुण्डल दीप्तिमते : कानात मणियुक्त कुंडल धारण करणारा  
34.चंचलद्वाल सन्नद्धलम्बमान शिखोज्वला : ज्याची शेपूट त्याच्या डोक्यहूनही ऊंच आहे  
35.गन्धर्व विद्यातत्वज्ञ : आकाशीय विद्याचा ज्ञाता
36.महाबल पराक्रम : महान शक्तिचा स्वामी
37.काराग्रह विमोक्त्रे : बंदिवासातून मुक्त करण्यासाठी
38.शृन्खला बन्धमोचक: तणाव दूर करणार  
39.सागरोत्तारक : महासागर ओलांडारा सशक्त
40.प्राज्ञाय : विद्वान
41.रामदूत : रामाचा राजदूत
42.प्रतापवते : वीरतेसाठी प्रसिद्ध
43.वानर : वानर   
44.केसरीसुत : केसरी पूत्र  
45.सीताशोक निवारक : सीताचे दुख दूर करणारा  
46.अन्जनागर्भसम्भूता : अंजनीच्या गर्भातून जन्म घेणारा  
47.बालार्कसद्रशानन : सूर्यासारखा तेज  
48.विभीषण प्रियकर : विभीषणाचा हितैषी
49.दशग्रीव कुलान्तक : रावणाच्य राजवंशाचा नाश करणारा  
50.लक्ष्मणप्राणदात्रे : लक्ष्मणाचे प्राण वाचवणारा  
51.वज्रकाय : धातू सारखे मजबूत शरीर
52.महाद्युत : सर्वात तेज  
53.चिरंजीविने : अमर रहणारा  
54.रामभक्त : रामाचा परम भक्त
55.दैत्यकार्य विघातक : राक्षसांच्या सर्व उपक्रमाला नष्ट करणारा  
56.अक्षहन्त्रे : रावणाचा पुत्र अक्षयाचा अंत करणारा  
57.कांचनाभ : सोनेरी रंगाचे शरीर
58.पंचवक्त्र : पाच मुख असणारा  
59.महातपसी : महान तपस्वी
60.लन्किनी भंजन : लंकिनीचा वध करणारा  
61.श्रीमते : प्रतिष्ठित
62.सिंहिकाप्राण भंजन : सिंहिकाचे प्राण घेणारा  
63.गन्धमादन शैलस्थ : गंधमादन पर्वत पार निवास करणारा  
64.लंकापुर विदायक : लंकादहन करणारा  
65.सुग्रीव सचिव : सुग्रीवाचा मंत्री
66.धीर : वीर
67.शूर : साहसी
68.दैत्यकुलान्तक : राक्षसांचा वध करणारा  
69.सुरार्चित : देवतांद्वारे पूजनीय
70.महातेजस : अधिकांश दीप्तिमान
71.रामचूडामणिप्रदायक : रामाला सीतेचा चूड़ा देणारा  
72.कामरूपिणे : अनेक रूपं धारण करणारा   
73.पिंगलाक्ष : गुलाबी डोळे असणारा  
74.वार्धिमैनाक पूजित : मैनाक पर्वताद्वारे पूजनीय
75.कबलीकृत मार्ताण्डमण्डलाय : सूर्याला गिळणारा  
76.विजितेन्द्रिय : इंद्रियांना शांत ठेवणारा  
77.रामसुग्रीव सन्धात्रे : राम आणि सुग्रीवमध्ये मध्यस्थी असणारा 
78.महारावण मर्धन : रावणाचा वध करणारा  
79.स्फटिकाभा : एकदम शुद्ध
80.वागधीश : प्रवक्तेचा देव  
81.नवव्याकृतपण्डित : सर्व विद्यांमध्ये निपुण
82.चतुर्बाहवे : चार भुजा असणारा  
83.दीनबन्धुरा : दु:खी लोकांचा रक्षक
84.महात्मा : देव 
85.भक्तवत्सल : भक्तांची रक्षा करणारा  
86.संजीवन नगाहर्त्रे : संजीवनी आणणारा  
87.सुचये : पवित्र
88.वाग्मिने : वक्ता
89.दृढव्रता : कठोर तप करणारा  
90.कालनेमि प्रमथन : कालनेमिचे जीव घेणारा  
91.हरिमर्कट मर्कटा : वानरांचा ईश्वर
92.दान्त : शांत
93.शान्त : रचना करणारा  
94.प्रसन्नात्मने : हंसमुख
95.शतकन्टमदापहते : शतकंटाच्या अहंकाराला ध्वस्त करणारा  
96.योगी : महात्मा
97.मकथा लोलाय : श्रीरामाची कथा ऐकण्यासाठी व्याकुल
98.सीतान्वेषण पण्डित : सीतेचा शोध करणारा  
99.वज्रद्रनुष्ट : भावनांवर नियंत्रण करणारा 
100.वज्रनखा : वज्रासारका मजबूत नख  
101.रुद्रवीर्य समुद्भवा : महादेवाचा अवतार
102.इन्द्रजित्प्रहितामोघब्रह्मास्त्र विनिवारक : इंद्रजीताच्या ब्रह्मास्त्रच्या प्रभावाला नष्ट करणारा  
103.पार्थ ध्वजाग्रसंवासिने : अर्जुनाच्या रथावर विराजमान राहणारा  
104.शरपंजर भेदक : तीरांच्या घोंसल्याला नष्ट करणारा  
105.दशबाहवे : दहा भुजा असणारा 
106.लोकपूज्य : ब्रह्मांडाच्या सर्व जिवांद्वारे पूजनीय
107.जाम्बवत्प्रीतिवर्धन : जाम्बवतचा प्रिय  
108.सीताराम पादसेवा : राम आणि सीतेच्या सेवेत तल्लीन राहणारा  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती