मारूती सुझूकीच्या स्विफ्ट कारचे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कारची शेवटची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ज्यात यूनिटमधील काही कर्मचारी असेंबल करत असताना कारसोबत फोटो काढताना दिसत आहेत.
दरम्यान, कारच्या हूडवर लिहीण्यात आले आहे की, 'शेवटची स्विफ्ट - E07460'एका सुंदर प्रवासाची शेवटाकडे सुरूवात. नव्या सुरूवातीसाठी टीमकडून एक शानदार कार लवकरच. दिनांक - 23 डिसेंबर, 2017. स्विफ्टचे आता नव्हे व्हर्जन येत आहे. सन 2018मध्ये मारुती सुझूकी कारचे आणखी एक नवे कोरे मॉडेल लॉन्च करत आहे.
मारूतीच्या स्विफ्टचे वैशिष्ट्य असे की, 2005मध्ये लॉन्च करण्यात आले होते. या कारमध्ये 1.3 लीटरचे पेट्रोल इंजिन लावण्याता आले आहे. 2007मध्ये या कारचे फेसलिफ्ट मॉडेल आले. या मॉडेलमध्येही कंपनीने 1.3 लीटर डिझेल इंजिन दिले. 2010मध्ये कंपनीने कारचे पेट्रोल इंजिन रिप्लेस केले आणि त्या ऐवजी 1.2 लीटरचे सीरीज इंजिन दिले. 2011मध्ये मारूतीचे सेकंड जनरेशन स्विफ्ट हॅचबॉक मॉडेल मार्केटमध्ये आणले. ज्यात अनेक स्टायलीश फीचर होते. 2014मध्ये कारचे मिड लाईफ फेसलिफ्ट करण्यात आला.