आशीर्वाद

शरीर मेल्याने मुक्ती मिळत नाही मन मेल्याने मिळते

आशीर्वाद मागून मिळत नाही. तो वडील माणसांची सेवा केल्याने व त्यांच्या आल्हादकारक हृदयातून निघालेल्या कल्याणकारी श्रद्धानेच आशीर्वाद प्राप्त होतो. गुरुदेव सांदिपनींनी श्रीकृष्णाला गुरुदक्षिणा म्हणून वंशाची वृद्धी मागितली होती पण गुरूपत्नीची इच्छा होती की समुद्रात पडून मरण पावलेल्या आपल्या पुत्राला श्रीकृष्णाने जिवंत करावे व आणून द्यावे. श्रीकृष्णाने तेच केले. त्याने गुरूपुत्राला अत्यंत नम्रतापूर्वक गुरूच्या समोर सादर केला आपल्या मुलाला पाहून गुरूपत्नीचे हृद्‍य द्रवले व द्रवित हृदयातून आशीर्वादाचा पाझर फुटला ती श्रीकृष्णाला म्हणाली ''कृष्णा तुझा सर्वत्र विजय होईल. तुझ्या घरात लक्ष्मी व जिभेवर सरस्वती विराजमान होईल. तुझी र्की‍ती सदोदित वाढतच राहील.'' हृद्‍यातून निघालेले आशीर्वाद असे असतात. असेच आशीर्वाद फळाला येतात.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)

अनुवादकः सौ. कमल जोशी

वेबदुनिया वर वाचा