अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी इसुदान गढवी यांची पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले की, 16 लाखांहून अधिक लोकांपैकी 73 टक्के लोकांनी इसुदानच्या नावावर शिक्का मोतर्ब केले आहे.
AAP कडून सर्वोच्च पदाच्या शर्यतीत, त्यांच्या राज्य युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया, राष्ट्रीय सरचिटणीस इसुदान गढवी आणि सरचिटणीस मनोज सोराठिया यांचा समावेश होता. राज्यातील जनतेने पक्षाला दिलेल्या कौलाच्या आधारे उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले.
गेल्या आठवड्यात, केजरीवाल यांनी लोकांना एसएमएस, व्हॉट्सअॅप, व्हॉईस मेल आणि ई-मेलद्वारे पक्षाशी संपर्क साधून आणि राज्यातील पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा यावर आपले मत मांडावे असे आवाहन केले होते. सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे.