अमित शाह यांनी गोव्यात नेहरूंच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले

गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (13:46 IST)
भाजप गोव्यात पुन्हा आपले सरकार स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून पक्षाचे सर्व बडे नेते येथे पोहोचून प्रचारात व्यस्त आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील निवडणूक रॅलीला संबोधित करत म्हटले की 2022 च्या निवडणुकीत गोव्यात एका बाजूला काँग्रेस पक्ष आहे तर दुसरीकडे भाजप. कोणत्या पक्षाला पाच वर्षांचा जनादेश द्यायचा हे गोव्यातील जनतेने ठरवायचे आहे.
 
काँग्रेसची राजवट अस्थिरता आणि अराजकतेची होती असे ते यावेळी म्हणाले. भाजपने गोव्याला स्थैर्य आणि विकासाची राजवट दिली आहे तसेच गोवा हे देशातील सर्वात विकसित राज्य, सुवर्ण गोवा व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

गांधी परिवारासाठी गोवा हे पर्यटन स्थळ आहे, ते पर्यटक म्हणून येतात आणि पर्यटक म्हणून निघून जातात, असे ते बोलले.
 
गृहमंत्री अमित शहा यांनीही नेहरूंवर हल्लाबोल करत म्हटले की कॉंग्रेसने गोव्यावर नेहमीच अन्याय केला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असो की विकासासाठी, इतिहास साक्षी आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व निर्णायक ठरले असते, तर  गोव्याला देशातील इतर भागांप्रमाणेच 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले असते.

अमित शाह म्हणाले की बरेच लोक म्हणतात की गोवा हे खूप लहान राज्य आहे. मी देखील मानतो की गोवा हे खूप लहान राज्य आहे पण ज्याप्रकारे एका मुलीच्या कपाळावर बिंदी असते त्याचप्रकारे आपला गोवा भारतमातेची बिंदी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती