नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेला विजय मिळाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सहा फुटी फुलगुच्छ पाठविला होता. विधानसभेनंतर त्यांना 15 फूटी फुलगुच्छ पाठवावा लागेल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे लगावला. विधानसभा निवडणुकीतही राज्यात शिवसेनेला विक्रमी यश मिळवणार असल्याचा विश्वास उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
उध्दव ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीने ऐतिहासिक यश मिळवले आहे. हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे. महाराष्ट्रातील जनतेने सत्ताधार्यांना सपशेल नाकारले आहे. त्यामुळे पराभवावरून महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्यात यावे, असेही ते म्हणाले. शिवसेनेला केंद्रात किती मंत्रीपदे मिळतील, याबाबत त्यांनी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याची चर्चा करणार आहे.
नरेंद्र मोदी यांनी गरीबीत दिवस काढले आहे. त्यामुळे जनचेच्या प्रश्नांबाबत ते अधिक संवेदनशील आहेत. भाजप सरकार हे गरीबांचे सरकार असल्याचेही मोदींनी आपल्या भाषणात सांगितले होते.