राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा!

मंगळवार, 20 मे 2014 (10:58 IST)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेला भरघोस यशमिळाल्याबद्दल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सहा फुट उंचीचा पुष्पकुच्छ पाठवले आहे. निकालानंतर 'मोदी जिंकले बाकी सगळे हरले',अशी प्रतिक्रिया देणारे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यामागे काय उद्देश आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील मराठी जनतेने राज ठाकरेंना सपशेल नाकारले. एवढेच नव्हेतर मनसेच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉ‍झिटही जप्त झाले. जाहीर सभांमध्ये शिवसेनेवर टीका करणारे राज ठाकरे आता सहानुभूतीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला जात आहे.

यपूर्वी ठाणे महापालिका व कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचा विजय झाला तेव्हाही राज ठाकरेंनी अशाच प्रकारचे पुष्पगुच्छ मातोश्रीवर पाठवले होते.
निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेबांना दिलेले सुप काढल्यामुळे केवळ शिवसैनिकच नव्हे तर राज्यातील सर्वसामान्य जनताही राज ठाकरेंवर नाराज झाली होती.

वेबदुनिया वर वाचा