पंतप्रधान मोदींना मिळणार 1 लाख 60 हजार रूपये पगार

मंगळवार, 20 मे 2014 (14:16 IST)
येत्या काही दिवसांतच पंतप्रधानपदी विराजमान होत असलेल्या नरेंद्र मोदी यांना महिन्याला 1.6 लाख रूपये पगार मिळणार आहे. 

यात 50 हजार रूपये वेतनापोटी, 3000 रूपये खाणे पिणे, 62 हजार रूपये रोजचा भत्ता आणि 45 हजार रूपये संसदीय क्षेत्र भत्ता यांचा समावेश आहे. त्याशिवाय सरकारी निवासस्थान, स्वतंत्र स्टाफ, विशेष विमान आणि अन्य सवलतींसाठीही ते पात्र होणार आहेत. 

दिल्लीतील 7, रेसकोर्स हे पंतप्रधानांचे निवासस्थान आहे. 12 एकर क्षेत्रात पसरलेल्या या निवासस्थानात 5 बंगले आहेत. त्यात पंतप्रधानांचे कार्यालय, गेस्ट हाऊस, पंतप्रधानांची सुरक्षा करणार्‍या एसपीजींचे कार्यालय आणि एक मोठे सभागृह यांचा समावेश आहे. 

या बंगल्याला 1984 मध्ये राजीव गांधी यांच्या कार्यकालात पंतप्रधाननिवासाचा दर्जा दिला गेला आहे. तेव्हापासून आजतागायत 8 पंतप्रधानांनी हे निवासस्थान कुटुंबीयांसह वापरले आहे. मोदी पहिलेच पंतप्रधान असतील जे कुटुंबाशिवाय हे निवासस्थान वापरतील.

वेबदुनिया वर वाचा