नरेंद्र मोदी झाले संसदेच्या पायर्‍यांवर नतमस्तक

मंगळवार, 20 मे 2014 (17:46 IST)
देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (मंगळवार) संसदेच्या पायर्‍यांवर नतमस्तक होऊन सेट्रल हॉलमध्ये पहिल्यांदा झाले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील बडोदा आणि उत्तरप्रदेशातील वाराणसीमधून मताधिक्याने निवडूण आलेले भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पहिल्यांदा सभागृहात प्रवेश केला. 

यापूर्वी मोदी यांनी गुजरात विधानसभेत थेट मुख्यमंत्री म्‍हणूनच प्रवेश केला होता. मोदी आज सकाळी गुजरात भवनातून गाडीने संसद भवनात प्रवेश केला. गाडीतून  उतरल्यानंतर प्रथम मोदींनी संसदेच्या  पायर्‍यांना प्रणाम केला. नंतर सभागृहात प्रवेश केला. एनडीएच्या 335 खासदारांनी मोदींची यावेळी भव्य स्वागत केले. नंतर मोदींची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे ज्येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनी मोदींच्या नावाची शिफारस केली. त्याला सर्व खासदारांनी अनुमोदन  दिले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवून कॉंग्रेसचा  सुपडा साफ केला आहे.

वेबदुनिया वर वाचा