उपवास स्पेशल : साबुदाण्याची टिक्की रेसिपी

शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (06:36 IST)
उपवासाचे पदार्थ सर्वांना आवडतात पण काही वेळेस तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. याकरिता आपण आज साबुदाण्यापासून बनणारा एक पदार्थ पाहणार आहोत. जो आहे साबुदाणा टिक्की. साबुदाणा टिक्की खायला जेवढी स्वादिष्ट लागते तेवढीच ती बनवायला देखील सोप्पी आहे.  
 
साहित्य-
साबुदाणा 200 ग्रॅम 
उकडलेले बटाटे 100 ग्रॅम  
6 हिरव्या मिरच्या
6 काजूचे तुकडे
1 चमचा जिरे पावडर
आमसूल पूड 
सेंधव मीठ 
तळण्यासाठी तेल
 
कृती-
साबुदाणा टिक्की बनवण्यासाठी साबुदाणा रात्रभर भिजत घालावा. आता बटाटे उकडून घयावे व साल काढून मॅश करून घ्यावे. आता एका मोठ्या बाऊलमध्ये बटाटा, साबूदाना, हिरवी मिरचीचे तुकडे, भाजलेली जिरे पूड, आमसूल पूड आणि सेंधव मीठ घालावे. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याच्या टिक्की बनवून घ्या. आता पॅनमध्ये तेल गरम करून एक एक टिक्की भाजून घ्या. आता प्लेट मध्ये काढून पुदिना चटणी किंवा दही सोबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती