रताळ्याचा शिरा

शुक्रवार, 30 जुलै 2021 (12:42 IST)
साहित्य- 
1 वाटी किसलेलं रताळं
2 कप दूध
2 चमचे साजूक तूप
3 चमचे साखर
अर्धा लहान चमचा वेलची पूड
2 चमचे खोवलेलं नारळ
ड्राय फ्रूट्सचे काप
 
कृती - 
एका कढईत तूप गरम करुन यात किसलेलं रताळं घालावं. नीट परतून घ्यावं. त्याचा रंग बदलल्यावर त्यात दूध घालावं. एक उकळी घ्यावी. आता त्यात साखर घालावी. आता हे मिश्रण नीट ढवळून एकत्र करावं. नीट शिजवून घ्यावं. शिजत आल्यावर त्यात खोवलेलं खोबरं, वेलची पूड आणि सुके मेव्याचे काप घालावे. एक वाफ घेऊन गॅस बंद करावा. ‌
 
टीप: रताळं किसून न घेता उकडून कुस्करून देखील घेता येतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती