वज्रकाया नमो वज्रकाया

शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (12:18 IST)
वज्रकाया नमो वज्रकाया।
भीमरूपा प्रभो रुद्रराया ॥ ध्रु।।
 
दिव्य उड्डाण हे, भव्य दोर्दंड हे I
शक्त सूर मंडळा कापवाया ॥१॥
 
पुच्छ विक्राळ हे, त्रासवी पाहती ।
उग्र दंष्ट्रा तुझ्या विश्वकाया ॥२॥
 
ब्रम्हचर्य ध्वजा भूतळी रोविली ।
नित्य यम किंकरा कापवाया ॥३॥
 
रामचंद्र प्रभू सेवूनी दाविला ।
ईशपद पंकजी मार्ग जाया ॥४॥
 
वीर्य दे शौर्य दे शक्ती दे भक्ती दे ।
इतर सर्व वाया मृत्यूंजया ॥५॥

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती