भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेली iNCOVACC ही नाकावाटे देण्यात येणारी लस 26 जानेवारीला बाजारात येणार आहे. कंपनीचे चेअरमन कृष्णा इला यांनी ही माहिती दिली आहे. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.हिंदुस्तान टाइम्स ने ही बातमी दिली आहे.