मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरेंना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असल्यांने कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित ठाकरेंची सध्या प्रकृती उत्तम असली तरी त्यांना खबरदारी म्हणून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.