उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी अटक केलेला व न्यायालयाने दि. 4 मार्चपासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याचा अहवाल बाधित आल्याने कोरोनाचे उपचार घेण्यासाठी त्याला सातारा जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डात दाखल केले होते. दि. 4 रोजी पहाटेच्या सुमारास त्याने हातातील बेडी काढून पलायन केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. मुबारक बंडीलाल आदिवासी (वय 25) रा. मध्यप्रदेश असे पळून गेलेल्या न्यायालयीन बंदी असलेल्या कैद्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या न्यायालयीन कस्टडीत असलेला मुबारक आदिवासी याच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दि. 31 मार्च रोजी त्याचा अहवाल बाधित आल्याने त्याला व किशोर हणमंत जाधव, रा. फलटण या दोघांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डात उपचारासाठी दाखल केले होते.