सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की दोन महिन्यांत कंपनी लशीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे. पूनावाला असेही म्हणाले की, अॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठासमवेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कोरोना व्हायरस लस तयार करीत आहे, ज्याचे टेस्ट रिझल्ट चांगले आले आहेत.
सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांपर्यंत असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली होती.