पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

बुधवार, 26 जून 2024 (12:48 IST)
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये घडलेल्या पोर्श कार दुर्घटना मध्ये आपल्या मुलीला गमावणाऱ्या एका आईने  मंगळवारी न्यायालयात न्याय मिळवा म्ह्णून मागणी केली. त्या म्हणाल्याकी आई चे दुःख समजून निर्णय घेण्यात यावा. या प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला देखरेख गृहमधून सोडून देण्याच्या न्यायालयच्या आदेशानंतर महिलेने हा भावनिक जबाब दिला. 
 
पुण्यामधील कल्याणी नगरमधील 19 मे ला झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा सहभाग आहे. या अपघातामध्ये दोघांनाच जागीच मृत्यू झाला आहे.
 
पोलिसांना संशय होता की आरोपी नशेमध्ये होता. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ति भारती डांगरे आणि न्यायमूर्ति मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठने मंगळवारी आरोपीला देखरेख गृह मधून काढण्याचे आदेश दिले.  
 
पोर्श कार अपघातात मृत्यू झालेल्या मुलीची आई म्हणाली की "हे बातमी पाहून मी स्तब्ध झाली होती.''  मला न्यायपालिका वर विश्वास आहे. त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला असेल. माझी न्यायालयाला विनंती आहे की, त्यांनी एका आईचे दुःख समजून घ्यावे. मी माझी मुलगी गमावली आहे. आरोपीला शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणात योग्य न्याय व्हायला हवा. म्हणजे न्यायव्यस्थेवर नागरिकांचा विश्वास टिकून राहील.
 
तसेच मृतक मुलीची आई म्हणाली की, महाराष्ट्र सरकारने देखील विश्वास दिला आहे की, आम्हाला न्याय मिळेल. तसेच न्यायपालिकाला माझी विनंती  आहे की, या प्रकरणात योग्य न्याय व्हायला हवा आणि आरोपीला शिक्षा मिळावी. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती