मोदी म्हणाले की देशाला वाचवण्यासाठी, देशातील प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकावर घरातून बाहेर पडण्याची बंदी लावली जात आहे. हा लॉकडाउन कर्फ्यूसारखा समजावा, कारण हा अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल. अशात घरातील उंबरठा ओलांडू नये हेच आपल्यासाठी आणि देशाच्या आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, करोना विषाणूग्रस्तांची चाचणी करण्यासाठीच्या सुविधा, PPE, ICU, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे प्रशिक्षण या सगळ्यांसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं असून हा आजार वेगानं पसरत आहे त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे. यासाठी साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. आर्थिक नुकसान असल्याचे सांगत मोदींनी जान है तो जहान है असं म्हणत देशवासियांना धीर दिला.